कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....
कोण आहे नेमके विरोधात सामान्य माणसाला कळत नाही...
पंधरा दिवसांत विरोधकांची भूमिका सत्ताधारी होत आहे....
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....
नाही उरली नैतिकता ना उरली नितीमत्ता...
डोक्यात एकच कशीही करून मिळवायची फक्त सत्ता...
अफजल खानाच्या फोजेशी घटस्फोटाच्या होत्या नुसत्याच बाता...
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....
आघाडी सरकारच्या काळात झाले म्हणे घोटाळे....
पण तुम्ही म्हणून कमी नाहीत....
सुरवात केली आहे जनतेची काढयला दिवाळे...
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....
निर्यात बंद करून साखरेचे भाव पाडले...
दूधाचे दर कोसळवले...
शेतकर्याला प्रत्येक वेळी नाडायचेच धोरण तुम्ही ठरवले....
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....
आला दुष्काळ नाही घाबरत आम्ही....
अवकाळीचाही सामनाही खंबीरपणे करतो आम्ही....
पण मदत करायचं सोडून मुळावर का उठता तुम्ही...
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....
दिवस उगवलाय की वाजवताय एकच तुणतुणे....
आघाडी सरकारने नाही ठेवले तुमच्यासाठी काही उणे...
आत्महत्या करण्याआधी लाईटबील भरा मंत्री म्हणे...
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....
देशी दारू पिऊन मेले तरी मिळते नोकरी....
अपघातात कोणी गेले मदत करता तरी...
पण इंजिनिअरींग करूनही आम्हाच्या माथी बेरोजगारी....
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....
बोगस डिग्र्या मिरवण्यात कसली वाटते फुशारकी....
लहान जीवांना खायला खालताय मातीची चिक्की...
अन पोहचवल्याची मारताय उगाचच टिमकी....
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....
लग्न करतो दोन पण प्रतिज्ञापत्रात बायकोच लपवता एक
बोगसपणाची हद्द केली आहे सगळं फेक...
उशिरा लक्षात यायला लागले आहे तुमचे मनसुबे फेक आहेत की नेक...
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....
दिवस उगवला की काढताय नवी योजना नवा डे...
स्वतःच काढताय स्वतःचे धिंडवडे...
तुमच्या पायउतार होण्याचाही साजरा करू "घरवापसी" डे
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....
गणेश दादा शितोळे
(०८ जुलै २०१५)
(०८ जुलै २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा