प्रेमात मनाला हे नेहमीच जिंकावं लागतं..
आयुष्याच्या वाटेवर चालता चालता
कधी तू भेटशील असं वाटलंच नव्हतं...
आयष्याच्या वाटेत तू साथ देणारी भेटली.
अन माझं आयुष्यच बदलून गेलंय आता वाटत होतं..
मैत्री, आधार, माणूसकी, प्रेम, नाती, आपुलकी
सगळं नकळत अर्थासह कळू लागलं होतं...
ऊन, वारा, पाऊस हे सगळं विसरून
मन फक्त तुझ्या झोक्यात वाहू लागलं होतं...
व्हाॅट्स अप अन हाईकच्या दुनियेत
मन तुझ्याबरोबर रमू लागलं होतं....
सगळीकडे आनंदी आनंदच होता
कारण जिकडे तिकडे तूच आहे वाटत होतं...
सकाळच्या गुड मॉर्निंग पासून ते
रात्रीच्या गुड नाईट पर्यंत फक्त तुझं असणं होतं...
हातात खायला घेतलेल्या पदार्थापासून ते
टिव्हीवर बघणार्या सिरीअल्स पर्यंत फक्त तुझं असल्याचं भासत होतं...
मला काय झालंय हे मोबाईलचा व्हायब्रेट झाला की
अंगात तरंग जाणवल्यावरच कळत होतं...
ह्याला नक्की प्रेम म्हणायचं की मैत्री
तेव्हढं मात्र माझ्या मनाला कळत नव्हतं...
तुझ्या नकळत या नात्याला
प्रेम आहे असंच गृहीत धरलं होतं...
मैत्री म्हणता म्हणता प्रेम करू लागलोय
हे तुझ्या प्रेमात पडल्यावरच कळू लागलं होतं...
अर्ध्या वाटेवर पोहचल्यावर जाणवलं की
तुझ्या आयुष्यात माझ्या सारख्या अनेक लोकांना स्थान होतं...
आयष्याच्या खेळात पहिल्यांदा हरावं लागलं होतं..
तेव्हा मात्र माझं मलाच वाईट वाटू लागलं होतं....
मनात कधी न येणारे क्रोध, द्वेष, चिडचिड,
जेलसी, पझेसिव्ह होणं
सगळं काही भावनिक जाणवू लागलं होतं....
बघता बघता तू आपल्या नात्यातील गाठ सोडून
मला सोडून दूर निघून जात आहे वाटत होतं...
आयुष्यात दु:खाचे
डोंगर कोसळू लागलेत
मन कायम याची साक्ष देत असल्याचं भासत होतं....
जिथं रात्र रात्र जागून तुझ्या सोबत हसायला होत होतं..
अन तुला शोधता शोधता मी स्वतःच स्वतःला हरवून जायला झालं होतं...
मन तुला परत मिळवण्याचा हर एक प्रयत्न करत होतं....
अन तुला शोधता शोधता माझं मलाच विसरून बसलं होतं....
भेटशील तू पुन्हा नव्याने एकदा तेव्हा
तुला गमवायचं नाही एवढ्याच आशेवर जगत होतं...
जेव्हा तू सापडलीस तेव्हा
मनानं तुला दुखावलंय सारखं वाटत होतं...
सोबतीनं तुझ्या पुढं चालायला गेलो तर
आयुष्याची वाट उरल्याचं मनाला दिसत नव्हतं....
शेवटी पोहचल्यावर लक्षात आलं की
आयुष्यात मैत्री झाल्यावर प्रेम होऊ शकतं...
पण एकदा व्यक्तीच्या प्रेमात पडल्यावर
पुन्हा त्याच व्यक्तीशी प्रेम सोडून मैत्री होणं शक्य नव्हतं....
गेला तो काळ अन राहिल्या त्या तुझ्या आठवणी....
पुन्हा कधी त्याच वाटेवर चालू लागलो तर
तुझं हे वाक्य कधीच विसरलं जाणार नव्हतं....
" प्रेमात मनाला हे नेहमीच जिंकावं लागतं.. "
जमलं कधी तर सगळं विसरून
माफ कर या वेड्या मनाला ..
या चिमुकल्या मनाला कधी कळलंच नव्हतं...
नात्यात नक्की प्रेम म्हणजे काय अन मैत्री काय असतं...
गणेश दादा शितोळे
(२२ ऑक्टोबर २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा