माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, २३ जुलै, २०१५

तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....

आठवणींच्या जगात जायला निघतो...
तेव्हा शब्द येतात मज भेटायला...
लेखणीतून कागदावर उतरायला...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....

बोलायचं असतं खरंतर मनातून खूप काही....
पण ओठ बोलायचं सोडून देतात...
अन शब्द मनातच खोलवर रूतून जातात....
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....

ऐकावी वाटतात कधी गाणी सुमधूर. ..
ताल सुर करतात बेधुंद एकांतात मन...
डोळ्यांत उभे राहतात गाण्यातल्या वर्णनाचे क्षण...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....

कधी सुरू असतो एकट्याने प्रवास बाईकवरून...
रस्ता घेत असतो वळणाहून वळण...
मन मात्र विचारात गुंग होतं एक क्षण...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....

येते कधी जवळच्या माणसाची आठवण दाटून..
आसवे नयनांची जाती साथ सोडून..
जणू मृग विसरतो बरसायचं नभ असून...
तेव्हा सुचतात मला काही चारोळ्या अन कविता....


 गणेश दादा शितोळे
(२३ जुलै २०१५)


बुधवार, ८ जुलै, २०१५


कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....

कोण आहे नेमके विरोधात सामान्य माणसाला कळत नाही...
अफझलखान च्या टोळीशी घरोबा केल्याशिवाय मराठी अस्मितेला रहावत नाही....
पंधरा दिवसांत विरोधकांची भूमिका सत्ताधारी होत आहे....
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....

नाही उरली नैतिकता ना उरली नितीमत्ता...
डोक्यात एकच कशीही करून मिळवायची फक्त सत्ता...
अफजल खानाच्या फोजेशी घटस्फोटाच्या होत्या नुसत्याच बाता...
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....

आघाडी सरकारच्या काळात झाले म्हणे घोटाळे....
पण तुम्ही म्हणून कमी नाहीत....
सुरवात केली आहे जनतेची काढयला दिवाळे...
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....

निर्यात बंद करून साखरेचे भाव पाडले...
दूधाचे दर कोसळवले...
शेतकर्‍याला प्रत्येक वेळी नाडायचेच धोरण तुम्ही ठरवले....
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....

आला दुष्काळ नाही घाबरत आम्ही....
अवकाळीचाही सामनाही खंबीरपणे करतो आम्ही....
पण मदत करायचं सोडून मुळावर का उठता तुम्ही...
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....

दिवस उगवलाय की वाजवताय एकच तुणतुणे....
आघाडी सरकारने नाही ठेवले तुमच्यासाठी काही उणे...
आत्महत्या करण्याआधी लाईटबील भरा मंत्री म्हणे...
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....

देशी दारू पिऊन मेले तरी मिळते नोकरी....
अपघातात कोणी गेले मदत करता तरी...
पण इंजिनिअरींग करूनही आम्हाच्या माथी बेरोजगारी....
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....

बोगस डिग्र्या मिरवण्यात कसली वाटते फुशारकी....
लहान जीवांना खायला खालताय मातीची चिक्की...
अन पोहचवल्याची मारताय उगाचच टिमकी....
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....

लग्न करतो दोन पण प्रतिज्ञापत्रात बायकोच लपवता एक
बोगसपणाची हद्द केली आहे सगळं फेक...
उशिरा लक्षात यायला लागले आहे तुमचे मनसुबे फेक आहेत की नेक...
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....

दिवस उगवला की काढताय नवी योजना नवा डे...
स्वतःच काढताय स्वतःचे धिंडवडे...
तुमच्या पायउतार होण्याचाही साजरा करू "घरवापसी" डे
आहो कुठं नेऊन ठेवायचाय महाराष्ट्र माझा....


गणेश दादा शितोळे
(०८ जुलै २०१५)


रविवार, ५ जुलै, २०१५


आजकाल आनंदही अश्लील झालाय.....

आजकाल व्हाट्स अप ग्रुपवर,
अश्लील पोस्ट्सचा स्तोम माजलाय....
त्यावरच हसण्याचा प्रत्येक जण आनंद घेतोय...
कारण आजकाल आनंदही अश्लील झालाय.....

ग्रुपला नाव शिवछत्रपतींच देतोय...
पण पोस्ट मधे अश्लील शिव्या देण्यात धन्यता मानतोय...
शिवरायांचा असा अपमान रोजच केला जातोय...
कारण आजकाल आनंदही अश्लील झालाय.....
.
चांगल्या पोस्ट्स चा इथं प्रत्येकानं धसकाच घेतलाय...
एखादा चांगल्या पपोस्ट्स करतोय...
तर त्याला तत्वज्ञानाच्या नावाखाली त्यालाच नावं ठेवताय..
कारण आजकाल आनंदही अश्लील झालाय.....

अश्लील पोस्ट्सने रोजचा दिवस उगवतोय...
अन दिवस लोकांच्या उचापती करण्यातच जातोय...
अश्लील विनोद झाला तरच इथे आनंद होतोय...
कारण आजकाल आनंदही अश्लील झालाय.....

कोण इथं इतर धर्मियांच्या भावना भडकवतोय..
तर कोण इथं परदेशी संस्कृतीचा टिमका मिरवतोय...
एवढं करण्यातच यांना आनंद वाटतोय...
कारण आजकाल आनंदही अश्लील झालाय.....

इथं स्वाभिमान गहाण टाकला जातोय...
घरी आईचा ओरडा न ऐकणाराही ऐकून घेतोय...
शिवीला प्रत्योत्तर शिवी देण्यात यांना आनंद येतोय...
कारण आजकाल आनंदही अश्लील झालाय.....

इथं दुसर्‍याचं चांगले ऐकायला कोणाला जमतंय....
स्वतःच अति शहाणं असल्यासारखं वाटतंय...
अश्लील पोस्ट्सला भरभरून प्रतिसाद देतोय...
कारण आजकाल आनंदही अश्लील झालाय.....

अश्लील पोस्ट्स वाचण्याचा कंटाळा आलाय....
आता इथं चांगलं काही पोस्ट करण्याचाही,
मनाला खरंच कंटाळा आलाय...
कारण आजकाल आनंदही अश्लील झालाय.....



गणेश दादा शितोळे
(०५ जुलै २०१५)