माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३

लक्ष्मीकांत....





तमाम मराठी प्रेक्षकांना आपल्या धमाकेदार भुमिकांनी खळखळून हसवणारा आवडीचा लक्ष्या आजच्या दिवशीच आपल्याला हसवता हसवता निघून गेला. 
कलावंत म्हणजे नेमकं काय..?जगाला हसवणारा विदुषक साकरताना त्या विदुषकाच्या मुखवट्यामागं लपलेला एक वेदनेचा चेहरा लक्ष्मीकांतनं पुढं आणला. महेश कोठारे सोबत साकारलेला झपाटलेला महाराष्ट्राला झपाटून गेला....अन ओम भट स्व्हा म्हणत तात्याविंचू अजरामर केला.अशी ही बनवा बनवी मधून साकारलेली अशोक सराफ यांच्या बायकोची स्त्री व्यक्तीरेखाही मनात घर करून गेली...महेश कोठारे, अशोक सराफ अन लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकूटानं आपल्या अभिनयातून मराठी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं....पण जास्त लक्षात राहीला तो लक्ष्याच..सलमान खान सोबतहम आपके है कोनमैंने प्यार किया अशा हिंदी सिनेमातून यशस्वीपणे हिंदी चित्रपट सृष्टीही गाजवून सोडली. प्रेम इतकाच त्याला मदत करणारा लक्ष्या मनात राहिला...३ नोव्हेंबर २००४ साली याच खळखळून हसवणार्‍या लक्ष्यानं आपला निरोप घेतला अन जाता जाता रडवलं....आज स्मृतिदिनी माझ्या अन तमाम मराठी प्रेक्षकांच्या लाडक्या लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या ला वंदन....जाता जाता लक्ष्यासाठी एक शेवटचं वाक्य हेच...आयुष्यात आनंदाच्या क्षणांव्यतिरिक्तही तुझ्यामुळे खळखळून हसलो...पण आवडीच्या लक्ष्या हसण्यार्‍या प्रेक्षकांसोबत त्यादिवशी पहिल्यांदा कोणा कलाकारांसाठी मी रडलो...

गणेशदादा शितोळे 
(३ नोव्हेंबर २०१३)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा