मैत्रीच्या बदलत्या टप्प्यात...!
हा हा करत डिप्लोमाची आणि इंजिनिअरींगची वर्षे भूरकन उडून गेल्यासारखी सरकली. जे मित्रमंडळी या वर्षात भेटले मिळाले ते आत्ता सोबत नाहीत याचं दुःख नाही. ज्या मैत्रीणी भेटल्या त्यांच्याकडे आज साधा मेसेज करायला वेळ आहे का हाच प्रश्न. ऐन उमेदीतील तरुण मित्रमैत्रीणी २०१० ते २०१४ च्या दरम्यान काही शिक्षणाकरता वा काही करिअरकरता दूर गेले ते आत्ता बहुतेकदा पेड फ्रेण्ड झालेत असं वाटतं. कारण आपणच स्वतःहून त्यांना नेहमी फोन केला तर त्यांना आपल्याशी काय बोलावे इथपासून सुरवात होते. तर आपणच उगाच फोन केला आहे असं वाटून बळजबरीने नाती टिकवल्यासारखं भासतं. नाहीच जमलं फोन करायला तर मेसेजचा रिप्लाय तरी करावा हीच एक माफक अपेक्षा असते. असो जे काही होतं ते आपल्या भल्याकरताच असतं असं म्हणून प्रत्येक दिवस जगायला हवा. आनंदाची गोष्ट हीच की त्यांची आणि आपली भेट होत नसेल आपल्यातील अंतर वाढले असेल पण कधी वेळ मिळेल तेव्हा भेटण्याची माझी तरी उमेद तशीच टिकून आहे.
काहींनी प्रेमप्रकरणं नुकतीच जन्माला आली आहेत तर काही अजून नशीबालाच दोष देत प्रतिक्षेत आहेत. काही असही म्हणतात आमचं आता ब्रेकअप झालंय तर काही प्रेम असल्याचं जाणवू देत नाहीत आणि नकारघंटा हलवत असतात. काहींची लव्हस्टोरी चोरीचोरी चुपके चुपके सुरू होती आणि आजही आहे अशा सर्व मित्रमैत्रीणींना शुभेच्छा.
तारुण्याच्या प्रवेश करण्याच्या या वयाच्या आसपास जे मित्रमैत्रीणी नव्या आयुष्याच्या नव्या जीवनाच्या वेगळ्या दिशेच्या वा सहवासाच्या शोधात करिअरच्या बोटीत वा विमानात चढले त्यांना त्यांचे भविष्य कसा आकार घेणार हे अर्थातच माहिती व्हायचे आहे.
सध्यातरी बिझी लाईफ ही संज्ञा त्यांच्यात रुढ व्हायची आहे. ते सर्व मित्रच होते आणि त्यांची आजचे राहण्याचे निवास कुठेही असले तरी त्यांची मैत्रीतली ओढ कायम राहावी. नव्या क्षितीजाकडे चाललेले हे प्रवासी त्यांच्या बिझी लाईफमधून त्यांच्या मित्रमैत्रीणींना विसरू नये ही एकच भावना आहे. स्वातंत्र्यानंतर जसा देश बदलला काहीसं तसंच करिअरकडे धावा असणारे आज बदलायला लागले आहेत नव्हे तर बदललेत. त्यांच्या आशा आकांशा बदलल्या आहेत. हे वयच सर्वंकष उलथापालथींचे असते. सर्वांनाच इंजिनिअर्स, डॉक्टरेट, आर्किटेक्टस नव्हे तर याहून आधिक पर्याय खुणावत असतात. त्यांना परदेशाचे तर विशेष आकर्षण असते. पण हे लक्षात राहायलाच हवे की करिअर पाठीमागे धावता धावता कदाचित अमाप पैसा मिळू शकेल पण त्याच वेळी मैत्रीची काही पानं याच रस्त्याने गळत जातील.

हे नक्की आहे की माझ्या ह्या वाक्यावर काही मित्र मैत्रीणी असाही युक्तीवाद करतील की काही तरी कमवण्यासाठी काही तरी गमवावेच लागते. पण त्यांनी कधी आपण काय गमावतोय आणि काय कमावतोय याचा नक्की हिशोब करावा. बाकी नक्कीच पैसा उरेल पण मैत्रीची गळालेली ती पाने कदाचित नव्हे तर कधीच विकत घेऊ शकत नाहीत. करिअरच्या आकर्षणात निदान काही प्रमाणात का होईना जीवनात आलेली कोंडी दुर्दम्य आशेमुळे फुटू शकेल. मात्र करिअर करताना कौटुंबिक सुरक्षिततेच्या सीमा ओलांडताना आणि करिअस सेटल झाल्यानंतर जीवाची घालमेल झाली नाही तर नवलच. याउलट मित्रपरिवार सोबत असला तरी करिअर सेट होतेच. त्याचा पाया मैत्रीच्या बंधाने पक्का झालेला असतो. कारण करिअर करताना काय चूक बरोबर याची जाणीव प्रत्येक वेळी करुन देणारं कोणीतरी बरोबर असते. कौटुंबिक वातवरणाबाहेरही सुरक्षिततेची सीमा ओलांडली तरी जीवाची घालमेल शक्यतो होतच नाही आणि झालीच तर आधार द्यायला कोणीतरी असतंच. त्या कोणीतरी मधे जीर्न झालेल्या मैत्रीच्या पानांबरोबरच नव उमंग नवचेतना देणारी ताजी टवटवीत पानंही असतात.
मैत्री जशी जीर्न नाही पण जूनी होत जाते तसतशी अजून घट्ट व्हायला हवी. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत उलटच होत असतं. करिअर सोबत मैत्रीला नवीन पालवी फुटत जाते आणि जूनी पानं गळत जातात. आयुष्यात हे घडायलाच हवं. कारण जूनी पानं गळल्याशिवाय नवीन पालवी फुटतच नाही. मैत्रीतही वसंत ऋतूचा बहार यायलाच हवा. त्याशिवाय ती बहरूच शकत नाही. पण आपण त्या वसंताची वाट पहायला हवी. स्वतःहून वसंत ऋतू निर्माण करायचा प्रयत्न करू नये. एखादा नवीन मित्र मिळाला की जूनी पाने स्वतःच तोडून टाकू नयेत. ती आपोआप गळतातच. नाहीतर पानगळती अगोदर पानं तोडायचा प्रयत्न केला तर नवी पालवीही फुटत नाही आणि मैत्रीचा वृक्ष बोडखा होतो आणि मग उन्हाचे चटके बसायला लागतात. मग आपणच म्हणायला लागतो की मला जेव्हा गरज असते तेव्हा कोणीही बरोबर नसते मग त्यांनी मित्र कसं म्हणावं. या बोडखेपणाला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. कारण त्यांनी आपल्याला सोडण्याअगोदर आपणच त्यांना तोडलेलं असतं. यात बहुतेक जण असंही म्हणतात की आमची मैत्री कधी तुटली तेच समजलं नाही. पण त्यांना तुटली हे समजतं त्यांना त्यामागचं कारणंही माहीत असंतंच. फक्त त्यांच मन हे मान्य करायलाच तयार नसते.
मैत्री तुटत केव्हाच नसते ती तुटायला आपणच कारणीभूत ठरत असतो. झाडातला ओलावा नाहीसा झाला की जशी पाने गळून पडू लागतात. काहीसं तसंच मैत्रीतल्या विश्वासाचा ओलावा नाहीसा होऊ लागला की आपल्यासोबत असणारी माणसं दूर होऊ लागतात किंवा आपण त्यांच्यापासून दूर जातो.
तोच मैत्रीचा ओलावा टिकवा म्हणूनच आपण सदैव प्रयत्न करायला हवा. निदान काही प्रमाणात तरी तसा प्रयत्न करायला हवा. आजवरच्या प्रवासात प्रत्येकाला याचाच प्रत्यय आला असेल. आपण आयुष्यात नात्यांचे मखमली पदर उलगडत जगावे.
जेव्हा मी डिप्लोमातून इंजिनीअरींगला प्रवेश घेतला तेव्हा सुरवातीला हा जीवघेणा प्रवास नकोसा वाटला. असंच काहीसं प्रत्येकाला वाटलं नसेल तर नवलच. आपल्यापैकी काहींना तर लगेचच किंवा लवकरच डिप्लोमालाच परत जावे असेही वाटत होतेच. पण तरीही त्या स्नेहाच्या पिंजऱ्यातून आपण इथपर्यंत आलो आहोत आणि इथेच आपले जीवन स्वतःच्या हिमतीवर उभे करण्याचा निर्धारच बहुतेकांनी केला आणि त्यासाठी प्रयत्न करत आहोत.
कदाचित आपल्यासाठी तो निर्धार निश्चितच सोप नव्हता. पण तरीही त्या दृष्टीने आपण सर्वांनी एक पाऊल टाकले आहे. डिप्लोमानंतर इंजिनीअरींगला प्रवेश घेतल्यानंतरच्या एकदम सुरवातीच्या काळात किंवा आताच्या इंजिनीअरींग पूर्ण झाल्यानंतर करिअर करताना गेल्या पाच-सात वर्षांपासून आपल्याबरोबर सोबत असणारा मित्रपरिवार एकदम फोन करायलाही दुरापस्त होतो याचा विचार करायलाच हवा. मान्य आहे की कॉलेजला एकत्र असताना रोज होणारे फोन कॉल्स, मेल्स, मेसेज आता करिअर करताना कमी झालेले असतील. तरी याचा मैत्रीवर परिणाम होत नसतो आणि तो होऊही नयेच कारण फक्त याकरीता मैत्री असूच शकत नाही.
काही म्हणतात आमच्या मैत्रीतील ही सायलेंट भाषा आहे. म्हणजे फक्त रोजच्या धाकाधुकीच्या आयुष्यात फोन कॉल्स, मेल्स, मेसेज केला तरच मैत्री टिकते असे नाही. केवळ संवाद म्हणजे मैत्री होत नाही. मैत्रीची सायलेंट भाषा असू शकते. पण ही वादळापूर्वीची शांतता ठरू नये ईतकच. कारण मैत्रीत बहूतेकदा हे घडतच की इतक्या दिवस एखाद्याचा आपल्याला येणारा फोन वा छोटासा मेसज आजकाल येतच नाही किंवा कमी झाला आहे हे खटकत राहते. सुरवातीला आठवड्याला येणारा फोन महिन्याला विशिष्ट वेळेला आणि नंतर फक्त वाढदिवसाच्या दिवशीच येऊ लागतो हे सुरवातीला जाणवू लागलं नाही तर नंतर नंतर खटकत जाते आणि सरते शेवटी ही सायलेंट नावाची भाषा वादळापूर्वीची शांतता ठरू लागते. मैत्रीत इगोचं वादळ घर करु लागतं. समोरचाच आपल्याला फोन मेसेज करत नाही ना मग आपण तरी का करायचा असा म्हणाणारा दोघांचा इगो समोरासमोर येतो. दोघातला संवाद कमी होत जातो आणि अक्षरशः स्वप्नवत वाटत नव्हते ती जीवाभावाची मैत्री कायमची तुटत जाते नव्हे ती तोडली जाते.
फेसबुक उघडलं तेव्हा एका मित्राने अपलोड केलेलं स्टेटस वाचलं आणि धक्काच बसला. लिहलं होतं त्याच्या ग्रुपमधले काही जण त्याला आणि ग्रुपमधल्या बाकी मित्रांना विसरायला लागलेत आणि त्याच्या मते त्यामागे करिअर हे कारण होतं.
धक्का बसायला कारणच तसं होतं. माझा मलाच विश्वास बसत नव्हता की जीवाभावाची मैत्री असणारा ग्रुप करिअर सारख्या फुटकळ कारणाने तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहचलाच कसा. त्यांची मैत्री कशी होती हे मी जवळून पाहिलेली आहे. डिप्लोमच्या त्या शेवटच्या वर्षभरात त्यांच्याशी असलेली ओळख मैत्रीत बदलेली होती. त्यांच्या मैत्रीत एखाद्या प्रेमी युगलाहून जास्तच संवाद होता. प्रत्येकजण प्रत्येकाच्या भावना जपत मैत्रीचे नाते निभावत होता. मी आठवड्यातून वा महिन्यातून विशिष्ट वेळेला विशिष्ट दिवशी मित्रांना फोन करायचो. पण यांच मात्र उलटच सदैव फोनवर चिकटलेलेच. स्वतःच्या डोकोमोचा बँलंस संपवायचेच. पण माझा बँलंसही वापरला जायचा. त्यांच्या ग्रुपमधे मी कधी मेंबरशीप केलीच नव्हती. पण माझा सेल नंबर त्यांच्याकडे सेव्ह होता. त्या एका कारणानेच ग्रुपमधल्या इतरांशी ओळख वाढत गेली. त्यामुळे आज त्यांच्या मैत्रीच्या या स्टेटसचा धक्का बसतो. इंजिनीअरिंगच्या सुरवातीला हेच ग्रुपमधले सर्वजण फोन केला की दाटलेल्या गळ्यांनी बोलायचे. एकमेकांना इकडे सगळे ठीक आहे काहीही काळजीचे कारण नाही असे सांगायचे आणि आईवडीलांसारखं व्यवस्थित असल्याचं सांगून एकमेकांना आधार द्यायचे. प्रत्यक्षात प्रत्येकाला अनेक अडचणी असायच्या.
होस्टेलवरच्या या मित्रांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कधी पैसे पुरायचे नाहीत, एखाद्या वेळेस नको ती भांडणं अंगलट यायची, रात्री रस्त्याने भटकताना थंडी झेपवायची नाही, जेवणा खाण्याचे हाल व्हायचे, कधी मित्रवर्तूळ बरोबर नसल्याने एकटेपणा वाटायचा, मनात चलबिचलेचे काहूर माजायचे. पण या सर्व अडचणीत हेच ग्रुपमधले मित्रमैत्रीण एकत्र असायचे जवळ नसले तरी तसा आधार द्यायचे. आज तेच सहकारी एकमेकांना विसरायला लागलेत ही भावना त्यांच्यात का आली हे मला तरी अजूनही कळलं नाही. पण ज्या कारणाने त्यांच्या मनात ही भावना आली त्या करिअरचा यात दोष असेलही पण याला सुरवात डिप्लोमा संपल्यानंतरच झाली होती. कारण जेव्हा करिअरच्या नावाने वेगवेगळ्या कॉलेजला जॉईन झाले तेव्हाच काहींचा मैत्रीच्या वटवृक्षाला वसंताचा बहार आला आणि नव्या पालवी प्रमाणे नवीन कॉलेजला नवीन मित्रमैत्रीणी मिळाले. त्यांच्या भाऊगर्दीत जून्या मित्रमंडळीशी होणारा संवाद हळूहळू कमी होत गेला आणि आज त्याच जुन्या मित्राच्या मानात आपल्याला विसरलं जाण्याची भावना येण सहाजिकच होते. कारण नवी पालवी फुटताना मैत्रीच्या वृक्षाची जूनी पानं गळण्याआधीच ती तोडली गेली होती. असो.
खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात ही चेंजिंग फेज येतेच. पण हे टाळता येऊ शकतं. कारण या चेंजिंग फेजमधे जरी नवीन ग्रुप तयार झाला तरी जुन्या मित्रमंडळीना यातून वेळ देता यायला हवा. मैत्रीत संवाद कायम राहिला हवा. या चेंजिंग फेजमधे सुरवाती सुरवातीस नवीन मित्रमैत्रीणींसोबत आलेले अनुभव, गमतीजमती, नव्या ओळखी अशा अनेक गोष्टी अगदी सविस्तरपणे जून्या मित्रमैत्रीणींशी शेअर केल्या जातात. पुढे पुढे त्याचा ओघ कमी होत जातो आणि मग एकमेकांच्या संपर्काची वाट पहावी लागते. कोण पहिल्यांदा फोन करेल आणि भेटल यात मग टाळण्याची प्रथा सुरू होते. त्यामळे अशा वेळी इगोच्या अहारी गेलेले कधी काळी त्या व्यक्तीकरता जीव कासाविस करणारे त्या व्यक्तीशिवाय नवीन मित्रमैत्रीणीत मिसळून स्वावलंबी झाल्यासारखे वागायला लागतात. यात जे कधी एकत्र राहत होते ते वेगळे होऊन जगायला शिकतात.
जून्या जीवनशैलीला सोडून नवीन सहकाऱ्यांसोबत हळूहळू रुळू लागतात आणि ती नवीन जीवनशैली मनात आणि जीवनात घुसत घर करुन राहते. ही चेंजिंग फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असते. यातूनही नवीन जुन्याचा बॅलंस संभाळत जगणारे फार थोडे आहेत. यातून मैत्री कायम राहण्याचा संस्कार रुजण्यास सुरवात होते. त्यामुळेच अशा व्यक्तींना भावनिक आणि मानसिक सहवासाची कमी कधीच जाणवत नाही.
वैयक्तिक माझ्याच बाबतीत बोलायचं झालं तर मी आत्तापर्यंतच्या जीवनात जी काही मैत्री जपण्याचा प्रयत्न केला, त्यातून डिप्लोमा, डिग्रीच्या चेंजिंग फेजमधे जे काही कमावले, गमावले त्यात असे सहकारी मिळाले की आयुष्यात कधी एकटेपणाची भावना जाणवणार नाही याची खात्री निश्चितच वाटते. म्हणतात ना, आयुष्यात कधी कोणाला इतकं आपलं म्हणू नये की त्याची सवय व्हावी आणि त्यामुळेच मी कधीही केवळ एका विशिष्ट ग्रुपमधे गुंतून राहिलो नाही. कदाचित त्याचा तोटा झालाही असेल. कारण कदाचित त्यामुळेच मी कधीही एक विशिष्ट व्यक्तिचा बेस्ट फ्रेण्ड झाला नाही. मला प्रत्येक वेळस नवीन मित्र भेटत गेले. पण जुन्या सहकाऱ्यांशीही मैत्री जपण्याचा प्रयत्न केला. काही मित्रांना ही मैत्री डोईजड वाटू लागल्याने दुरवालेही आहेत. आज त्यांना साधा मेसेज केला तरी त्याला एखादा रिप्लाय करु वाटत नाही. यात कोणाचा इगो आडवा येतो माहित नाही. पण म्हणून मी मैत्री तोडण्याचा पर्याय कधीच निवडला नाही. त्यामुळेच आज मी मैत्रीच्या एका ढेरेदार वृक्षाखाली टिकून आहे.

गणेश दादा शितोळे
(२० डिसेंबर २०१३)
(२० डिसेंबर २०१३)