नव्या या आयुष्याच्या वळणावर,
जुनीच ती पाऊलवाट आहे चालायाची,
अनोळखीच्या पाऊलखुणा शोधत
साथीने तुझ्या ही वाट अशीच चालायाची...
नव्या शब्दांची नव्या भावनांची
ओळख हुळवार तुला मला व्हायाची...
खाचखळग्यातूनही हळूवार
पानापानातून आपली वाट काढायाची...
खळखळत्या नदी नाल्यासोबती
वाट मुक्यानेच सारे समजायाची...
तुझे माझे सारू विसरून
आपली होत एकेक पाऊले टाकायाची...
मी झालो निशब्द तरी
भाषा तू माझीही व्हायाची...
प्रेम, विश्वासाचा कटाक्ष टाकत
अलगद काटा बाजूला करत वाट आपण ही चालायाची...
एखाद्या वळणाला कधी चुकामुक झाली
कधी तू कधी मी एकमेकांसाठी वाट थांबायाची...
वहात्या वाऱ्याने आण दिली कवितेला की तू
मला कविता म्हणून वाटेवरती भेटायची…
दिवस सरले, कागदाची पानं बदललं तरी
आयुष्याची वाट आपण चालत राहायची...
हाती हात देऊन महिना झाले तरी,
आपण अशी वर्षे सोबतीने जगायाची....
गणेश सुवर्णा तुकाराम
(२ जून २०१९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा