मला भेटलेला आनंदयात्री - निखिल पठारे
आयुष्यात काही वेगळं करण्याची जिद्द दाखवली तर आयुष्यही निश्चित काही वेगळं पदरात टाकतं. यात जी काही माणसं भेटली ती आयुष्याने दिलेली एक वेगळी भेटंच. अशी भेट म्हणजे. निखिल. मला भेटलेला आनंदयात्री. खरंतर आज मी मला भेटलेला आनंदयात्री मध्ये ज्या व्यक्तिविषयी लिहीतोय, त्याला मी अजून तरी प्रत्यक्ष भेटलो नाही. पण तरीही तो मला भावला. एक आनंदयात्री म्हणून. स्वत:च्या आयुष्यात आनंद देणे वेगळा भाग आणि दुसऱ्याच्या चेहऱयावर आनंदाचे हसू फुलवणं वेगळा भाग. तो या दुसऱ्या प्रकारात मोडणारा.
खरंतर त्याची माझी कधीच भेट नाही. तरीही त्याच्या बाबतीत मला कायमंच आपलेपणाची गाठ आहे. निखिलशी ओळख झाली ती सोशल नेटवर्कींग साईटवरूनच. म्हणजे तसं मी अगोदरपासून ओळखत होतो. पण ते केवळ आमच्या बहीणीच्या आयुष्याचा जोडीदार म्हटल्यावर ओळख ठेवलीच पाहिजे म्हणून. आजवर फक्त प्राचीचा नवरा म्हणून त्याला ओळखत होतो. तो माणूस म्हणून कसा आहे मला उशीरा समजलं. पण माझ्या बहीणीला निवडणाराही तिच्यासारखाच अचूक असणार हे गृहीत धरलेलं. तो तेव्हापर्यंत कसा होता कधीच माहिती नव्हतं. पण त्याची नव्याने ओळख झाली. व्हाट्सअपवर जेव्हा प्राचीच्या स्टेटस पाहिल्यावर जेव्हा प्रयासच्या यंदाच्या उपक्रमाची छायाचित्र पाहिल्यावर त्याच्या विषयी अधिक जाणून घेण्याची ओढ लागली. मग प्राचीला विचारलं. त्याचं फेसबुक चाळलं. अन शेवटी प्रयासच्या माध्यमातून तो काही वेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहे हे लक्षात आलं. खरंतर त्याचं काम हे शब्दात मावणारं नाही. कारण स्वतःहून काही वेगळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे सहसा कुणी मनावर घेत नाही. अन वेगळं काही शब्दांत मांडता येत नाही तर ते फक्त घडवता येतं.
रोजच्या नीत्यनियमाप्रमाणे फेसबुक चाळत असताना निखिलच्या वॉलवर एक कविता वाचली. शब्द. खरंतर ती कविता हा महत्वाचा भाग ठरला मला तो आनंदयात्री भावण्यात. म्हणजे तोही माझ्याच प्रांतामधला. लिहीणारा. नंतर हळूहळू बाकी गोष्टी वाचल्या. त्याचं नि:शब्द मेत्री हे सदर वाचून तर तो अधिकंच भावला. प्रयासच्या माध्यमातून आलेले अनुभव वाचायला आवडले. तेव्हा पहिल्यांदा वाटलं की आमच्या बहीणीने एका परिपूर्ण माणूस आयुष्याचा जोडीदार आहे. आयुष्यात चांगली माणसं अभावानेच आढळतात अशा एका चांगल्या माणसाला भेटायचंय लवकरच.
नुकतंच इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात प्रयासची यशोगाथा वाचली. निखिल विविध गावांतून त्याच्यासारख्या शेकडो इतर विद्यार्थ्यांसाठी जगण्याचा सोपा मार्ग बनविण्याच्या प्रयत्नात आहे. प्रयासच्या माध्यमातून आयुष्य स्वत:करता जगताना त्यात इतरांना सामाविष्ट करून त्यांच्याही चेहऱ्यावर हसू फुलवताना मनाला मिळणारं समाधान कदाचित शब्दात मला व्यक्त करता येणार नाही. सामान्यत: आयुष्यात शिक्षणानंतर चांगली नोकरी करत पैसा कमावत जगणे इतकी सोपी व्याख्या करत जगण्याची प्रयत्न करणारीच आजची पिढी. पण प्रयासची स्थापना करून नेमकी हीच आयुष्याची दिशा बदलली अन आज या टप्यावर पोहचलेला प्रवास जगण्याची वेगळी उर्मी देणारांच. प्रयासची सुरवात करताना असणारी त्यामागची भूमिका अन आज प्रत्यक्षात आलेल्या अनुभवांची सांगड घालत ही प्रकाशबीजं अशीच रोवली जातीलच. प्रयास म्हणजे रेल्वे आहे. आपण त्यात बसलो आहे. अन एकेका थांब्यावर तीचं प्रकाशबीजे रोवत चालूंच आहे. तसं खरंतर प्रयास अन निखिलवर भरभरून लिहिलं असतंच. पण अनुभव स्वतःला घ्यायला लागतात. ते असेच मांडता येत नाहीत.
खरंतर यात मला प्राचीची मदत घ्यायची होती. पण कामाच्या गडबडीत फोन करता आलं नाही अन ती या प्रांतातली नसल्याने तीला काही लिहीता येत नाही. पण मी जेव्हा लिहीणार होतो तेव्हा तिचं वाक्य होतं. “ भाई, तू ना खूप भारी आहे, तुला आसपासच्या साध्या माणसामधलं साधेपण सुद्धा भावून जाते. ” तेव्हा सांगायचं राहून गेलं की आयुष्याकडं साधेपणाने बघायची सवय लागल्यानेच साध्या व्यक्तीच्या साध्या गोष्टी मला परिपूर्ण करून जातात. निखिल सारखा आयुष्याचा असा जोडीदार तुला मिळाला आहे की खरं म्हणायचं तर त्याच्याकडे आयुष्याकडे साधेपणानं बघण्याचा दृष्टीकोन आहे. तो जे करत असेल ते साधे असेलही. पण त्यामागची भूमिका त्या साधेपणाला भावून नेते.
“तो त्याचं आयुष्य अन त्याची स्वप्नं,
या प्रत्येकात वेगळेपण आहे...
पण रस्ते वेगळे असले तरी,
आमचं ध्येय एकंच आहे....”
आज निखिलचा वाढदिवस, तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. या आनंदयात्रीचा शेवट करताना एवढंच सांगतो.
“तू अन ती,
एका रेशीमगाठी सारखेच रहा,
एक दोर दुसर्यात गुंफल्यासारखेच व्हा...”
(हे आमच्या बहीणीच्या जोडीदाराकरता)
“तुम्ही प्रकाशबीजं रूजवत जा,
आम्ही प्रकाश वाटेने चाललोच आहोत..”
(हे एकाच रस्त्याने चाललेल्या सहप्रवाशाकरता)
![]() |
आणि हो मनापासून धन्यवाद.
“मला भेटलेला एक आनंदयात्री म्हणून,
हा पण अजून आपली प्रत्यक्ष भेट व्हायचीय....”
गणेश(दादा) शितोळे
०३ मार्च २०१८









