भारताचा राष्ट्र ध्वज तिरंगा होता, आहे आणि रहाणार....
भारताचा राष्ट्र ध्वज तिरंगा होता आहे आणि रहाणार....
तसाच भारत हा धर्म निरपेक्ष होता आहे आणि रहाणार...
बाकी कुणी कितीही धार्मिक द्वेषाचे राजकारण केले तरी हे बदलणार नाही.शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला त्याच्या नंतर त्याचीच कबरही डौलाने बांधली. कारण माणूस संपला की वैर संपते...आणि वैर माणसाशी नसते विचारसरणीशी असते...शिवाजी महाराजांनी कधीही मुसलमान द्वेषापोटी स्वराज्य स्थापन केले नाही. ना कोणाचा घरवापसी धर्मांतर घडवून आणले...नाहीतर मग औरंगाजेबात आणि त्यांच्या मधे काय फरक उरला असता...शिवाजी महाराजांचे विचार समजले तर त्यांना आदर्श माणने योग्य आहे. नाहीतर त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन मिरवण्यापुरते आदर्श मानणे ही एक प्रकारची बदनामीच आहे...
गणेशदादा शितोळे
(१५ ऑगस्ट २०१६)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा