माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

मी चालत असतो...!!!

मी चालत असतो,
तो मात्र तरीही बोलत असतो...
मनातल्या मनात,
काहीतरी कुजबुजत असतो...

तो काहीसा पटत असतो,
तर काहीसा खटकतही असतो...
तो मात्र तरीही बोलत असतो,
अन मी ढिम्मपणे ऐकत असतो...

कधी त्याच्या सरळसोट बोलण्याने,
काहींना तो फटकळही वाटतो...
पण त्याच्या उघडपणे बोलण्यानेच,
तो मला कायम आवडतो....







गणेश दादा शितोळे
(१८ ऑगस्ट २०१६)