कॉलेज संपल्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस...
पहिल्यांदाच जुने ते सर्व मित्र सोडून वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं...
काहींच्या बाराच्या ठोक्याला शुभेच्छा आल्या तर काहींच्या शुभेच्छा येण्याची अपेक्षा असताना वाट बघत नवीन दिवस उजाडला. अनेकदा वाटलं की मित्र परिवारामधे रहाणारा मी आज एकटाच भासतोय. अनेक मित्रांनी शुभेच्छा दिल्या तरी काही जण कामाच्या गडबडीत विसरून गेले याचं वाईटही वाटलं. कदाचित त्यांच्या लक्षात असेल पण राहून गेलं असावं. असो. पण दरवेळेस सोबत असणारे मित्र यंदाच्या वाढदिवसाला नसल्याचं दुःखही वाढदिवसाच्या आनंदात आहे. फॅमिली सोबत तर दरवर्षी सेलिब्रेशन होतं तसंच आजही झालं. तरी केक, सोबत म्हणली जाणारी भलतीच पोयट्ररी अन केक तोंडाला लावतानाची धावपळ यंदा उडाली नाही. कालही मागच्या वाढदिवसाला जमलेली मित्रमंडळी अन सोबतचं हटके सेलिब्रेशन यंदा मात्र मिस केलं. कॉलेजकॅन्टीनमधला राडा यंदा झालाच नाही.
असो.. या निमित्ताने सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि आज जुन्या मित्रांसोबत "नही सही पर" त्यांच्या आठवणीँसोबत बर्थडे सेलिब्रेशन झालं...
काल रात्री बाराच्या ठोक्यापासून माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणार्या सर्व मित्र परिवार आणि हितचिंतकांचे आभार. वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष शुभेच्छा आयुष्य हटके अंदाजात जगण्याची प्रेरणा देत रहातील.
धन्यवाद.
गणेशदादा शितोळे
(०९ सप्टेंबर २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा