माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

वाढदिवस ०९ सप्टेंबर २०१५


काल वाढदिवस झाला...
आला दिवस तसा गेला...
पण एका दृष्टीने संस्मरणीय अनुभव देणारा ठरला...
खरंतर वाढदिवस म्हणजे नेमकं काय आहे हे मला अजूनही उमजलंय वाटत नाही....
आयुष्यात पुन्हा एकदा नवीन वर्षांत पदार्पण करीत असल्याचा आनंद की आयुष्य एक वर्षाने घटल्याचं दुःख...
असो दरवर्षी सारखा यावेळेसही वाढदिवस आला...
दरवर्षी मित्रांच्या कल्ल्यात साजरा होणारा दिवस खरंच काहीतरी सपेशल असा असावा वाटायचं...
परंतु यंदा काॅलेज संपलं..
मित्र परिवार आपापल्या करिअरच्या दृष्टीने मार्गस्थ झालेले...
मनाने जवळ असले तरी अंतराच्या सोबतीने जरा दूरच...
फांसलो से रिश्तोंमें दुरिया बढती है म्हणतात..
आजपर्यंतच्या आयुष्यात हे तितकेच खरे ठरले आहे....
डिप्लोमा काॅलेज संपल्यावर जसं वाटलं अगदी तसंच आजही वाटतंय...
काॅलेजमधे कॅडबरी वर सेलिब्रेशन होणारा वाढदिवस ऑनलाइन सेलिब्रिट झालाच...
कारण शेवटी आपलं ब्रीदवाक्यच आहे. ..
हे तर काहीच नाही
तसंच आजकालच्या ऑनलाइन जगात वाढदिवस साजरा करण्याचा नवा अनुभव आता पाठीशी आला...
डिप्लोमा काॅलेजमधे कधी एकत्रित सर्व मित्रमैत्रीणींसोबत वाढदिवस साजरा करण्याचा कधी अनुभव आला नाही...
पण हॉस्टेल वरच्या रात्रीच्या बर्थडे सेलिब्रेशन चा थरार अनुभवताना त्याची मुळीच खंत वाटत नाही...
आज त्या जून्या आठवणींची सोबत करताना थोडं हसू येताना डोळे पाणवतात हे नक्की...

कालही दरवर्षी प्रमाणे फोन मेसेज करून प्रत्येक जण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होतं..
यंदा व्हाट्स अपचीही त्यात भर पडली...
जरी अंतराच्या सोबतला कोणी नसेल तरी त्याची उणीव भरून काढताना हे सर्व मित्र सोबत आहेत असेच वाटले...
पण यावर्षी सेलिब्रेशन व्हायचं राहूनच गेलं...
पाटलांनी केक कापून न देता तोंडावर फेकून मारलेला प्रसंग आठवला की कालही कालच घडल्यासारखं वाटलं...
पण पाटील अन सोबत सर्व ग्रुपला काल खूप मिस केलं...
वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन आठवताना सर्व ग्रुपसोबतचा चार पाच वर्षातला प्रवास डोळ्यात पाणी आणून गेला...
गोवा ट्रीप, गॅदरींग आणि अजूनही बरच काही...
असो..
भोईटे रेसिडेन्सीवर साजरा होणारा निलेश अन संदीप सोबत तिघांचा एकत्रित वाढदिवस यंदा साजरा व्हायचा राहिलाच...
खरंतर सगळे आतुरतेने वाट पाहत होते पण मलाच जमलं नाही जायला...
तसंही आता फारसं जायची इच्छाच होत नाही तिथं....
आयुष्यातलं एक सुवर्णपान लिहिले ते डिके अन एकेच्या सोबतीने भोईटे रेसिडेन्सीवरच...
मन्याचे टोमणे ऑनलाईन फॉरवर्ड झाले पण काल मिस झालेच....
कोणि बोलके म्हणा नायतर चिडके म्हणा....
आपण मैत्रीत दगा अन नात्यात घात कधीच करत नाही....
अन केलाही नाही....
आजवर आयुष्य जगलो मित्रांच्या बळवर
अन
मित्रांच्या सोबत....
धन्यवाद मित्रांनो. ......
भावांनो आपली दिल दोस्ती दुनियादारी आयुष्यभर लाभो हीच सदिच्छा....

गणेशदादा शितोळे
(०९ सप्टेंबर २०१५)




कॉलेज संपल्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस...

पहिल्यांदाच जुने ते सर्व मित्र सोडून वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं... 
                 काहींच्या बाराच्या ठोक्याला शुभेच्छा आल्या तर काहींच्या शुभेच्छा येण्याची अपेक्षा असताना वाट बघत नवीन दिवस उजाडला. अनेकदा वाटलं की मित्र परिवारामधे रहाणारा मी आज एकटाच भासतोय. अनेक मित्रांनी शुभेच्छा दिल्या तरी काही जण कामाच्या गडबडीत विसरून गेले याचं वाईटही वाटलं. कदाचित त्यांच्या लक्षात असेल पण राहून गेलं असावं. असो. पण दरवेळेस सोबत असणारे मित्र यंदाच्या वाढदिवसाला नसल्याचं दुःखही वाढदिवसाच्या आनंदात आहे. फॅमिली सोबत तर दरवर्षी सेलिब्रेशन होतं तसंच आजही झालं. तरी केक, सोबत म्हणली जाणारी भलतीच पोयट्ररी अन केक तोंडाला लावतानाची धावपळ यंदा उडाली नाही. कालही मागच्या वाढदिवसाला जमलेली मित्रमंडळी अन सोबतचं हटके सेलिब्रेशन यंदा मात्र मिस केलं. कॉलेजकॅन्टीनमधला राडा यंदा झालाच नाही.  
                  असो.. या निमित्ताने सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि आज जुन्या मित्रांसोबत "नही सही पर" त्यांच्या आठवणीँसोबत बर्थडे सेलिब्रेशन झालं... 
                      काल रात्री बाराच्या ठोक्यापासून माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणार्‍या सर्व मित्र परिवार आणि हितचिंतकांचे आभार. वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष शुभेच्छा आयुष्य हटके अंदाजात जगण्याची प्रेरणा देत रहातील.  
धन्यवाद.


गणेशदादा शितोळे 
(०९ सप्टेंबर २०१५)