माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, ४ जून, २०१३

वाटल नव्हतं कधी असंही कधी घडेल.....!



वाटल नव्हतं कधी असंही कधी घडेल.....!
मीही कधी कोणाच्या प्रेमात पडेल.....
एखादी कविता मला
माझ्या प्रेमात पडेल....
अन मना शब्दांच्या विश्वात गुंतवून ठेवेल...

वाटल नव्हतं कधी असंही कधी घडेल.....!
चार पदरांच्या कडव्या मधून मला वाकडं दाखवेल...
हळूच एखादा शब्द घायाळ
करून मला इतका सतावेल...
शब्दांभोवतीच आयुष्य पिंगा घालत बसेल...

वाटल नव्हतं कधी
असंही कधी घडेल...!
स्वप्नामध्ये माझ्या कोणी हळूच शिरकाव करेल...
बोलायला "काहीच नाही"
म्हणून शब्दांत खुणावेल...
शब्दाशब्दांना गुंफत छानसं काव्य होईल...

वाटल नव्हतं कधी
असंही कधी घडेल...!
माझी कविताच माझ्या मनाशी बोलेल...
अन नेमक महत्वाचं
बोलतानाच अडखळेल...
मनातलं ओठांवर आणायचं
विसरून जाईल...

वाटल नव्हतं कधी
असंही कधी घडेल...!
जुन्या आठवणीत
रात्रभर कोणी माझ्यासह जागेल...
तिच्या विरहाचे चार दिवस
चार जन्माचे अंतर दाखवेल...
अन स्वप्नातली तिची भेटीचाही आनंद वाटेल...

वाटल नव्हतं कधी असंही
कधी घडेल...!
या एकाकी जीवनामध्ये
शब्दांच्या प्रेमाचा तरी स्पर्श लाभेल...
वाटल नव्हतं कधी असंही
कधी घडेल...!
माझी कविताच माझ्या प्रेमात पडेल....!



गणेश दादा शितोळे
(४ जून २०१३)