सोडुन दिलेला तिचा किस्साच आयुष्याचा हिस्सा बनून जातो...
सोडुन दिलेला तिचा किस्साच मग नंतर..
आयुष्याचा अविभाज्य हिस्सा बनून जातो...
मग आपलं आपल्यालाच कळत नाही...
आपण तिच्यासाठी आतून किती अन कधी झुरतो....
आठवायचं नाही आता त्या क्षणांना परत ठरवलं तरी...
एकांतात कायम त्याच क्षणांना आठवणीत घेऊन बसतो...
म्हटलं जरी तिच्या आठवणीत नाही रडायचं आता तरी...
नकळत आपणच डोळ्यांना वाट करून देत जातो...
मनालाच तिच्याशिवायही आनंदी आहे सांगत असलो तरी...
सांगण्याअगोदरच मनाला विरहाची आठवण करून देत जातो...
तू नही तो ओर सही कितीदा मित्रांना सांगितलं तरी...
जीव मात्र त्याच मोत्यात अडकला जातो...
वाटलं आयुष्याच्या पुस्तकातून त्या पानांना फाडून टाकावं कायमचं तरी...
पुन्हा पुन्हा आयुष्यातल्या त्याच फाटक्या पानांना वाचायला घेऊन बसतो...
वाटतं आता शेवटचे दोन शब्द लिहून झाल्यावर थांबबावं लिहणंही..
पण शेवटचे दोन शब्द लिहण्याअगोदरच आपसूकच कागद ओला होत जातो...
मनाशी कितीही ठरवलं ही शेवटची विरह कविता तरी...
प्रत्येकवेळी विरहाच्या शब्दांना गुंफत जातो...
वाटलं ती आयुष्यच्या रस्त्यातून खूप दूर गेली आहे तरी...
कवितेच्या ओळी सोबत तिला भेटून येत जातो...
गणेश दादा शितोळे
(२३ एप्रिल २०१३)